नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेखाबाई राकेश माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यादांच मनसे पक्षाच्या महिला कार्यकर्त्या सरपंचपदी विराजमान झाल्या असून नंदुरबार जिल्हा मनसेने ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला आहे.
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथील सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी निवड प्रक्रिया आज दि.26 सप्टेंबर 2023 रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी निवड प्रक्रियेचे अध्यासी अधिकारी म्हणून पानपाटील, सूर्यवंशी व ग्रामसेवक शरद गायकवाड यांनी कामकाज पाहिले. यावेळी काकर्दे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेखाबाई राकेश माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
याप्रसंगी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनिल कोकणी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, रायसिंग भिल आणि काकर्देचे उपसरपंच किरण मराठे, ग्रा.पं.सदस्य सुरेखा पाडवी, पुंडलिक मराठे, हिराबाई माळी, वैशाली महाजन, कलाबाई भिल, कांतीलाल ठाकरे, विमलबाई महाजन यांच्यासह रविंद्र माळी, भटु माळी, दत्तात्रय खलाणे, संतोष माळी, देविदास खलाणे, युवराज माळी, भावराव माळी, कन्हैय्यालाल माळी, भरत माळी, सोपान चव्हाण, नारायण मराठे, सुभाष मराठे, फारूक खाटील, नवल माळी, विठोबा माळी, अशोक माळी, पवन माळी, प्रप्फुल गिरासे, दिनेश मराठे, झुलाल भिल, धनराज माळी, शिवराम भिल, नथ्थु ठाकरे, कमलेश ठाकरे, संग्राम ठाकरे व ग्रामस्थ, मनसे सैनिक उपस्थित होते.
सरपंच रेखाबाई माळी ह्या नंदुरबार जिल्ह्यातील मनसेतर्फे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान होणार्या पहिल्याच कार्यकर्त्या आहेत. तसेच सरपंच रेखाबाई माळी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी यांच्या पत्नी आहेत. या बिनविरोध निवडीबद्दल सरपंच रेखाबाई माळी यांचे सर्वच स्तरावरुन कौतूक होत आहे. निवडीनंतर मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी सरपंच रेखाबाई माळी यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची नेहमीच काळजी घेण्यात येईल अशी ग्वाही दिली








