नंदूरबार l प्रतिनिधी
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात डी.जे. व डॉल्बी वापरण्यावर नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
19 ते 28 सप्टेंबर 2023 दरम्यान गणेशोत्सव सण साजरा होत आहे. तसेच 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर या कालावधीत ईद-ए-मिलाद सणानिमित्त मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
सण / उत्सवादरम्यान शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे काही समाज कंटकांकडून सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ प्रसारीत केले जातात. तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरुध्द नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर 24 तास विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
गणेशोत्सव काळात डी.जे. व डॉल्बी सिस्टीमचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण व पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होते. तसेच अशा डी. जे. डॉल्बी सिस्टीमचा आवाजामुळे आजारी, वृध्द व सर्वसामान्य नागरिक यांचे आरोग्यास तसेच जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 1 ऑक्टोंबर चे 24 वाजेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात ज्यामुळे ध्वनी प्रदुषण निर्माण होईल अशी साधने म्हणजेच डॉल्बी सिस्टीम यांना उक्त कालावधीसाठी जिल्ह्यात आणण्यास व त्यांच्या वापरास बंदी घालण्यात येत आहे.
समाज माध्यमांमध्ये चुकीची माहीती / अफवा जाणीवपुर्वक प्रसारित करणे यास निर्बंध घालण्यात येत आहे. कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहीती अफवा प्रसारित करु नये. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (2) चे आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्याकडुन जारी करण्यात आले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर च्या 24 वाजेपर्यंत ध्वनी प्रदुषण निर्माण होईल अशी साधने डी. जे. डॉल्बी यांना आणण्यास व त्यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तरी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद साजरा करतांना डी. जे. व डॉल्बी सिस्टीमचा वापर करु नये. तसेच ज्यामुळे ध्वनी प्रदुषण निर्माण होईल अशी साधने म्हणजेच डॉल्बी सिस्टीम यांना उक्त कालावधीसाठी जिल्ह्यात आणण्यास व त्यांचा वापरास बंदी घालण्यात येत आहे. समाज | माध्यमांमध्ये चुकीची माहीती/अफवा जाणीवपुर्वक प्रसारित करणे यास निर्बंध घालण्यात येत आहे. तरी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन करण्यात आलेले आहे.








