Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : जि. प. च्या गेटवर अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना अटक

team by team
September 25, 2023
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी : जि. प. च्या गेटवर अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना अटक

नंदूरबार l प्रतिनिधी

शहादा तालुक्यात लघु पाटबंधारे विभागातील केलेल्या तीन कामांच्या बिले काढण्यासाठी 20 हजाराची लाच मागून 19 हजार 500 रुपये लाच स्वीकारताना उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सन २०२२ सालात ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत लघु पाटबंधारे विभाग , जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत , शहादा तालुक्यात एकूण तीन कामे पूर्ण केली आहेत. नमूद तिन्ही कामांची रक्कम/बील काढून दिल्याच्या मोबदल्यात कनिष्ठ अभियंता, अतिरिक्त कार्यभार- उपविभागीय जलसंधारण अधिकारी , लघु पाटबंधारे विभाग , जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत पंचायत समिती, शहादा दिनेश केशवराव पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून एकूण ९५ हजार रुपयांची मागणी केली होती.

यापैकी वेळोवेळी ७५ हजार रुपये एवढी रक्कम दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून या आधीच वेळोवेळी घेतली आहे. उर्वरित २० हजार रुपये एवढ्या रकमेसाठी दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता. पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी दरम्यान तडजोडी अंती १९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. आज २५ सप्टेंबर २०२३ रोजी दिनेश पाटील यांनी जिल्हा परिषद नंदुरबार येथील मुख्य प्रवेशद्वारा जवळ तक्रारदार यांच्याकडून १९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम पंचसाक्षीदारां समक्ष स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार राकेश आ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि माधवी वाघ , पोहवा विलास पाटील, मपोहवा ज्योती पाटील, पोहवा अमोल मराठे, पोहवा देवराम गावित, पोना संदीप नावाडेकर, व पोना मनोज अहिरे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाच्या दंत तपासणी शिबिराला प्रतिसाद

Next Post

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात डी.जे. व डॉल्बी वापरण्यावर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात डी.जे. व डॉल्बी वापरण्यावर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात डी.जे. व डॉल्बी वापरण्यावर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add