नंदूरबार l प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादतर्फे पत्नी व मुलांना वाढीव पोटगी देण्याचे आदेश कायम ठेवण्यात आले.
अधिक माहिती अशी की, याचिकाकर्ते भानुदास जगताप रा. तालुका नवापूर, यांनी प्रतिवादी सौ. अनिता जगताप व इतर रा. नवापूर, यांच्याविरुद्ध सत्र न्यायालय, नंदूरबार, यांनी वाढीव पोटगी देणाऱ्या आदेशाला आव्हान देणारी रीट याचिका मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, येथे दाखल केली होती.
थोडक्यात माहिती अशी कि, प्रतिवादी पत्नी व मुलांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नवापूर, यांच्या समक्ष याचिकाकर्ते विरुद्ध पोटगी मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सदर अर्ज मंजूर करण्याचे आदेश पारित केले होते.
वाढीव पोटगीसाठी सत्र न्यायालय नंदूरबार, येथे अर्ज दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने सदर अर्ज मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले होते. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर) यांनी १३.०९.२०२३ रोजीच्या आदेशान्वये याचिकाकर्ते यांनी दाखल केलेली रीट याचिका नामंजूर करण्याचे तसेच वाढीव पोटगी चे आदेश कायम करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केलेले आहेत. पत्नी व मुलांतर्फे ॲड.गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.








