नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहायक सरकारी अभियोक्ता (गट-अ) परीक्षेत नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार येथील एकूण १७ विद्यार्थी पात्र झाले आहेत. तसेच एक विद्यार्थ्याची जिल्हा ग्राहक मंच सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यात ॲड.वर्षा वसावे, ॲड. लक्ष्मी पावरा,ॲड. वनिता वळवी,ॲड. गोमता पावरा,ॲड. कुवरसिंग वळवी,ॲड. रोहिदास पाडवी,ॲड. ईश्वर वळवी,ॲड. सुनील वळवी,ॲड.चेतन वळवी,ॲड. राजेंद्र मोरे,ॲड. चेतन भोई,ॲड. ज्ञानेश्वर पाटील, ॲड.पुजा भावसार, ॲड. प्रवीण ठाकरे, ॲड. सय्यदअली महफूजअली, ॲड.जितेंद्र गंगावणे, ॲड. सचिन पाटील यांच्या समावेश आहे. जिल्हा ग्राहक मंचाचे सदस्य म्हणून ॲड.संजय माणिक याची निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांच्या सत्कार नंदुरबार जिल्हा न्यायालयातील न्या.एस.टी.मलये, न्या.व्हीं.एन.मोरे, न्या.आर.एन.गायकवाड, न्या.डी.व्ही.हरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. नंदुरबार या आदिवासी व दुर्गम भागात गरिबीच्या परिस्थितीतून या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून त्यांची निवड झाल्याने सर्व विद्यार्थ्यांचे मा.न्यायाधीशांनी विशेष कौतुक केले.
न्या.श्री.हरणे यांनी विद्यार्थ्यांना सरकारी वकील म्हणून काम करताना न्यायालयाचे सहाय्यक म्हणून योग्य न्यायदान होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. न्या.श्री.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिकक्षमते सोबतच चारित्र्य जतन करणे अधिक महत्त्वाचे आहे हे विविध उदाहरण देऊन स्पष्ट केले. त्यांनी सरकारी वकील म्हणून काम करीत असताना काही व्यावसायिक मूल्य जपणे न्याय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे आहे असे नमूद केले. न्या.श्री.मोरे यांनी बिकट परिस्थितीतून यश संपादन करणे हे अधिक मोलाचे ठरते याची काही उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात नंदुरबार या दुर्गम व आदिवासी भागात अद्यावत सुविधांनी युक्त असे महाविद्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे व उत्तम अध्यापन सुविधाबद्दल प्राचार्य व सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर वर्गाचे आभार मानले.
या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एन.डी. चौधरी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. एस एस हासानी यांनी केले. कार्यक्रमात संस्थेचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.








