म्हसावद । प्रतिनिधी
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शिक्षकांवर नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाकडून अन्याय केला जात आहे. जिल्हा अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या ३०० जागा रिक्त असताना देखील त्या जागा नियंत्रणेकडून शिक्षक बदली पोर्टलला दाखवल्या जात नसल्याबाबतच्या मोठ्या प्रमाणात या तक्रारी निवेदन विधान परिषद सदस्य आमदार आमश्यादादा पाडवी, जिल्हा परिषद नंदुरबार शिक्षण सभापती गणेश पराडके, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, निलेश जाधव सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, सचिव सामान्य प्रशासन विभाग कक्ष मंत्रालय मुंबई यांना महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी सविनय निवेदन सादर करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सन २०२२-२३ च्या नंदुरबार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी आद्ययावत बिंदू नामावली मराठी व उर्दू माध्यमाची सुधारित बिंदू नामावली नोंदवही सहाय्यक आयुक्त नाशिक यांच्याकडून तपासणी करण्यात आली होती. अनुसूचित क्षेत्रातील पेसा प्रवर्गनिहाय रिक्त पदे ३०० मंजूर करण्यात आलेले होते. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्रमांक २०१४/प्र. क्र.२१३ अ /१४/१६-ब दि.५ मार्च,२०१५ व २६जून,२०१५ व शासन पत्र दि. २२ ऑगस्ट २०१७ अन्वये अनुसूचित क्षेत्रातील सुनिश्चित केलेली पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून राज्यपाल यांच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील रिक्त पदे स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरावयाचे आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण ) अधिनियम २००१ (सन २००४ चा महाराष्ट्र क्र.८) अन्वये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पदे आरक्षित ठेवणे व आरक्षणनिहाय पदे भरणे ही नियुक्ती प्राधिकार्याची जबाबदारी आहे.
सदर तरतुदीचे पालन न करता शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांनी प्राथमिक शिक्षकांच्या अनुसूचित जमातीतील फक्त ७८ रिक्त पद भरण्याचा परिपत्रक काढण्यात आले होते. बिंदू नामावलीत पुन्हा मोठा घोळ आढळला असून अनेक त्रुटी दुरुस्त करून नवीन संच मान्यतेनुसार पेसा अंतर्गत क्षेत्रातील पदभरती करण्यात यावी. मावक कडे सादर केलेल्या बिंदू नामावली प्रमाणे आज रोजी अनुसूचित प्रवर्गामध्ये एकूण ३०० जागा रिक्त असल्याचे समजते. त्यामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील शिक्षकांवर अन्याय झाला आहे.
याबाबतच्या बाबींचे आकलन केले असता याबाबत योग्य ती दुरुस्ती न केल्यास याबाबतची बाब निर्दशनास येत आहे तसेच अनुसूचित जमातीच्या जागा ३०० रिक्त असताना देखील त्याच जागा जि. प. यंत्रणे कडून भरती करण्यात येत नाहीत. यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोर्टल वरील सर्व अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागा सुधारीत आवश्यकतेनुसार विन्सेस आय.टी सर्विसेस प्रा. लिमिटेड पुणे कंपनी कडून मंजूर करण्यात आलेले आहे. त्या रिक्त पेसा क्षेत्रातील सर्व जागेवर अनुसूचित जमाती शिक्षकांची भरती करण्यात यावी. अनुसूचित जमाती शिक्षक बांधवांच्या जागा आपल्या प्रशासनाकडून दाखवल्या न गेल्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारीही प्रहार शिक्षक संघटनेकडे प्राप्त झालेले आहे. जिल्हा परिषद अनेक वर्षापासून प्रशासनाकडून जातीयवादी धरणाचा अवलंब करत असून काही विशेष जातीच्या लोकांच्या हितासाठी काम करत आहे.
बिंदू नामावली घोटाळा करून बिंदू नामावलीमध्ये प्रचंड खाडाखोड करून प्रचंड मोठा घोटाळा झाल्याची बाब निर्दशनास येत आहे. शासनाचे आदेश असताना देखील त्यांचे पालन करण्यात आलेले नाही. नवीन पदभरती पेसा क्षेत्रासाठी षडयंत्र रचले जात असून या षडयंत्राचा भाग म्हणून अनुसूचित जमातीच्या हक्काच्या जागा वगळल्या जात असल्याची गंभीर बाब निर्दशनास येत आहे. प्रशासनाची ही भूमिका अत्यंत गंभीर स्वरूपाची असून अनुसूचित जमाती शिक्षक बांधवांवर प्रचंड अन्याय करणारी आहे. याबाबत आपल्याला आणखी एक निर्वाणीचा इशारा देऊन आमच्या मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक तात्काळ निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवण्यात यावा. याबाबत वस्तुस्थिती असल्यास यामध्ये हस्तक्षेप करून तात्काळ पोर्टलवरील बिंदू नामावली सन २०२२-२३ नुसार रिक्त पदे भरण्यात यावी. प्रहार शिक्षक संघटनेमार्फत जिल्हा परिषद नंदुरबार येथे तूरवाद्य आंदोलन करण्यात आलेले होते. प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नसून त्याबाबत आमच्या मागण्या बाबत समाधान न करणारे व आमचे आंदोलन थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे प्रशासनाकडून दिशाभूल करण्यात आले आहे. यावरून प्रशासनाचा उद्दामपणा, हलगर्जीपणा, अनुसूचित प्रवर्गातील बांधवांच्या प्रश्नाबाबत उदासिनता दिसत असून या सर्व गोष्टी आंदोलनासाठी चेतावण्यात येणारे आहेत. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार शिक्षक संघटनेचे लवकरच धरणे आंदोलन करण्याचा इशारा यांनी देण्यात आलेला आहे.








