नंदूरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक शिक्षण समिती संचलित श्रीमती हिरीबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल नंदुरबार येथे २५०० विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठण केले.
गणपती उत्सवानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवामध्ये संगीतमय भक्तिमय गीतांचे आयोजन तसेच भक्तीमय गीतांवर नृत्य व अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत पाटील यांनी केले तर अथर्वशीर्ष पठण योगेश शास्त्री यांनी विद्यार्थी समवेत पठण करून घेतले.
आणि या संपूर्ण अथर्वशीर्षाचे अर्थ भानुदास शास्त्री यांनी सांगितला की, संगीतमय कार्यक्रमाचे संचालन हेमंत पाटील व त्यांच्या समूहने केला तर नृत्य कार्यक्रमाचे संचालन अनघा जोशी यांनी व त्यांच्या समूह यांनी केला. या कार्यक्रमा वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह उपमुख्याध्यापक राजेश शाह ,पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदीश पाटील ,क्रीडा प्रमुख भिकू त्रिवेदी, सांस्कृतिक प्रमुख भानुदास शास्त्री उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.