नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील 205 खाजगी, 457 सार्वजनिक, 107 एक गांव एक गणपती असे एकूण 766 गणेश मंडळांनी गणरायाचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्थापना केली आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या डॉल्बीमुक्त आवाहनास चांगला प्रतिसाद दिला.
सण उत्सव काळात विशेषत: गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त वातावरणात करण्याचा प्रयत्न पोलीस दलाने केला आहे. सण / उत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपरिक वाद्य वाजवून पर्यावरणपूरक पध्द्तीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलीस दलाच्या आवाहनास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. डी.जे. व डॉल्बी मुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.
यावर्षी देखील नंदुरबार जिल्ह्याची परंपरा कायम ठेवत गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजवता पारंपरिक वाद्य वाजवून गणेशोत्सव व इतर धार्मिक सण साजरे करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले होते. यावर उप विभगीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे स्तरावर गणेश मंडळांच्या बैठका घेवून पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या आवाहनाबाबत माहिती दिली होती. बैठकी दरम्यान गणेश मंडळांना पारंपरिक वाद्य वाजवून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलीस दलाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील नोंदणीकृत व इतर गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तीने गणेशोत्सव काळात गणेश मूर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणूकीत डी. जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करुन गणेशोत्सव सण साजरा करण्याचा निर्णय घेतलेला होता.
त्या अनुषंगाने 19 सप्टेंबर 2023 रोजी श्री गणेश चतुर्थीनिमित्त जिल्ह्यातील 205 खाजगी, 457 सार्वजनिक, 107 एक गांव एक गणपती असे एकूण 766 गणेश मंडळांनी गणरायाचे डी.जे. / डॉल्बी न वाजविता पारंपरिक वाद्यांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी श्री गणेश स्थापना नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी श्री गणेश स्थापना मिरवणुकीदरम्यान डी. जे. व डॉल्बी न वाजविता पारंपरिक वाद्य वाजवून पर्यावरणपूरक पध्द्तीने श्री गणेशाची स्थापना केली, म्हणून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.