नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक बुधवार 20 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हा व तहसिलस्तरावर भ्रष्टाचार निर्मुलन समित्या व दक्षता पथके स्थापन करण्यात आले असून शासकीय कर्मचाऱ्यांविरुध्द प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक आयोजित केली जात असल्याचेही श्री. खांदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे