नंदूरबार l प्रतिनिधी
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात यश संपादन करा असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवन येथे संपन्न झालीत्याप्रसंगी केले.यावेळी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख या पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका करण्यात आल्या आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना खासदार संजय राऊत यांनी गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पदाधिकारी नेमला गेला पाहिजे, शिवसेना महिला आघाडी युवा सेना व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचे देखील पदाधिकारी नेमून संघटनात्मक कार्यावर भर देण्याचे आदेश दिले. यावेळी शिवसेना उपनेते समन्वयक रवींद्र मिर्लेकर, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कमंत्री नामदार अब्दुल सत्तार शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, धुळे आणि नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना बबनराव थोरात यांनी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पदाधिकारी काम करत आहेत.त्यांना ताकद देण्याची आवश्यकता आहे.आगामी कालखंडात निश्चितपणे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून येतील त्यासाठी मशागत चालू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी बुथप्रमुख ते उपजिल्हाप्रमुख पर्यंत सर्व नियुक्त्या करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ते करीत असलेले कार्य जनमानसामध्ये अत्यंत लोकप्रिय झाले आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांचा मान वाढेल आणि त्याच बरोबर आपले संघटनाही वाढेल याकडे सर्वांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.या बैठकीला नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख संजय उकिरडे, महेश मिस्तरी, हिलाल माळी जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावित, हेमंत साळुंखे नंदुरबार जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे,आमशा पाडवी, धुळे महानगरप्रमुख सतीश महाले, मनोज मोरे, उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके,हसमुख पाटील,किरण जोंधळे महिला संपर्कसंघटक प्रियंकाताई घाणेकर,सौ.विद्या साळी आदी मान्यवर उपस्थित होते.