Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात यश संपादन करा : शिवसेना नेते खा. संजय राऊत

team by team
October 1, 2021
in राजकीय
0
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात यश संपादन करा : शिवसेना नेते खा. संजय राऊत
नंदूरबार l प्रतिनिधी
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात यश संपादन करा असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवन येथे संपन्न झालीत्याप्रसंगी केले.यावेळी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख  या  पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका करण्यात आल्या आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना खासदार संजय राऊत यांनी गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पदाधिकारी नेमला गेला पाहिजे, शिवसेना महिला आघाडी युवा सेना व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचे देखील पदाधिकारी नेमून संघटनात्मक कार्यावर भर देण्याचे आदेश दिले. यावेळी शिवसेना उपनेते समन्वयक रवींद्र मिर्लेकर, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कमंत्री  नामदार अब्दुल सत्तार शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, धुळे आणि नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना बबनराव थोरात यांनी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पदाधिकारी काम करत आहेत.त्यांना ताकद देण्याची आवश्यकता आहे.आगामी कालखंडात निश्चितपणे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून येतील त्यासाठी मशागत चालू असल्याचे त्यांनी  सांगितले.  यावेळी शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांनी  पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी बुथप्रमुख ते उपजिल्हाप्रमुख पर्यंत सर्व नियुक्त्या करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  पक्षप्रमुख  उद्धव  ठाकरे यांनी देशातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ते करीत असलेले कार्य जनमानसामध्ये अत्यंत लोकप्रिय झाले आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांचा मान वाढेल आणि त्याच बरोबर आपले संघटनाही वाढेल याकडे सर्वांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.या बैठकीला नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख संजय उकिरडे, महेश मिस्तरी, हिलाल माळी जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावित, हेमंत साळुंखे नंदुरबार जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे,आमशा पाडवी, धुळे महानगरप्रमुख सतीश महाले, मनोज मोरे, उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके,हसमुख पाटील,किरण जोंधळे महिला संपर्कसंघटक प्रियंकाताई घाणेकर,सौ.विद्या साळी आदी मान्यवर उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस अधीक्षक शिरीष जाधव सेवानिवृत्त

Next Post

नवापूर येथे शंभर बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई

Next Post
नवापूर येथे शंभर बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई

नवापूर येथे शंभर बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add