Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा 1 जुलै 2021 पासून नवीन दर लागू होणार

team by team
June 30, 2021
in राज्य
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. येत्या 1 जुलै 2021 पासून नवीन दर लागू होणार आहे.
बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्टयांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेल्या चुन्याचा दर आता 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे. उत्खननाद्वारे किंवा गोळा करुन काढलेले सर्व दगड आणि दगडाच्या भुकटीचा दरदेखील आता 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे.
बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगडाचा (लॅटराईट स्टोन) दर 150 रुपये प्रति ब्रास, उत्खननाद्वारे काढलेले किंवा गोळा केलेले गोटे, बारीक खडी, मुरुम, कंकर यांचा दर 600 रुपये प्रति ब्रास आणि केवळ बॉलमिल्सच्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येणारे चॅल्सेडोनी खडे यांचा दर 3000 रुपये प्रति ब्रास असणार आहे.
  सिरामिक किंवा मृतिकाशिल्पे तयार करण्याच्या प्रयोजनार्थ, धातूशास्त्रीय प्रयोजनार्थ, दृष्टिविषयक प्रयोजनार्थ, कोळसा खाणीमध्ये साठवून ठेवण्याच्या प्रयोजनार्थ, सिल्व्हीक्रेट सिमेंट तयार करण्यासाठी आणि मातीची भांडी आणि काच सामान तयार करण्यासाठी वापरण्यात न येणाऱ्या सर्वसामान्य वाळूचा दर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता 1200 रुपये प्रति ब्रास तर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे.
 कौले (मंगलोरी किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनाची) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी चिकणमाती, अंतर्गत बंधारे, रस्ते, लोहमार्ग आणि इमारती यांचे बांधकाम करताना भरणा करण्यासाठी/भूपृष्ठ सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी माती, बांधकामाचे साहित्य म्हणून वापरण्यात येते त्यावेळी पाटीचा दगड किंवा नरम खडक या सर्वांचा दर 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे.
विटा तयार करण्याच्या आणि इतर प्रयोजनासाठी वापरण्यात येणारी साधी माती, गाळ आणि सर्व प्रकारची चिकणमाती इत्यादी याचा दर 240 रुपये प्रति ब्रास असणार आहे. फुलरची माती किंवा बेटोनाईट याचा दर 1500 रुपये प्रति ब्रास असेल. सजावटीच्या प्रयोजनासाठी वापरावयाचे इतर सर्व प्रकारचे दगडाचा (ग्रॅनाईट वगळून) दर 3000 रुपये प्रति ब्रास असेल. इतर सर्व गौण खनिज (ग्रॅनाईट वगळून आणि केंद्र शासनाने दिनांक 10 फेब्रुवारी 2015 अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) दर 600 रुपये प्रति ब्रास असेल. गौण खनिजांचे ठोकबंद भाडे (ग्रॅनाईट वगळून आणि केंद्र शासनाने दिनांक 10 फेब्रुवारी 2015 अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) दर 9000 प्रति हेक्टर किंवा त्याच्या भागासाठी असेल, असे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा २३ वर्षांचा झाला, मात्र कुपोषणाचा कलंक कायमच!

Next Post

दुचाकीस्वाराकडून 53 हजारांचे गांजाचे बियाणे जप्त

Next Post

दुचाकीस्वाराकडून 53 हजारांचे गांजाचे बियाणे जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add