Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गौरी-गणपती व दिवाळी सणानिमीत जिल्ह्यातील अडीच लाख लाभार्थ्यांना 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

team by team
September 9, 2023
in राजकीय
0
गौरी-गणपती व दिवाळी सणानिमीत जिल्ह्यातील अडीच लाख लाभार्थ्यांना 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्हयातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेतील 2 लाख 66 हजार 90 पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गौरी गणपती व दिवाळी सणानिमित्त शासनाकडून 100 रुपयांत 4 शिधाजिन्नस संच
आनंदाचा शिधा वाटप करावयाचा निर्णय घेतला आहे.शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्या व्यतिरिक्त गणपती आणि दिवाळीमध्ये पात्र शिधापत्रिकाधारकांना पुन्हा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर खादयतेल मिळणार आहे.

सदया किराणा महागला असताना गोरगरीब कुटूंबीयांसाठी आनंदाचा शिधा आधार ठरणार आहे. गौरी-गणपतीच्या दिवसांत जिल्हयातील पात्र रेशन कार्डधारकांना 100 रुपयांमध्ये “आनंदाचा शिधा” रेशन दुकानांमध्ये मिळणारआहे. सणासुदीच्या दिवसांत खादयतेल, डाळी, साखरेचे भाव वाढल्याने सर्वसामान्य कुटूंबांसमोर प्रश्न उभा राहतो. आता मंत्रिमंडळ निर्णयानंतर शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचा लाभ होणार आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून वाटप सुरु असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली.

कोणाला मिळणार आनंदाचा शिधा ?

अंत्योदय, प्राधान्य कुटूंब, पात्र कार्डधारकांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे. आनंदाचा शिधा वाटपासाठी लवकरच जिल्हयात धान्याचा पुरवठा होणार आहे.

पुरवठा विभागाकडून मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधामध्ये 100 रुपयांत रेशनकार्डधारकांना एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर खादयतेल मिळणार आहे. हे साहित्य खुल्याबाजारात किमान 250 ते 280 रुपयांचे आहे.शासन निर्णयानुसार गौरी-गणपती उत्सवनिमित वितरीत करावयाचा संच दि. 01 सप्टेंबर, 2023 पासून ते दि. 30 सप्टेंबर, 2023 या कालावधीत व त्यानंतरचा दिवाळी सणानिमित्त वितरीत करावयाचा संच दि. 15 ऑक्टोंबर, 2023 पासून दिवाळी सणापर्यंत ( दि. 12 नोव्हेंबर, 2023) पर्यंत जिल्हयातील 2 लाख 66 हजार 090 पात्र कुटूंबाना आनंदा शिधा वाटपाचा लाभ मिळणार आहे.

गौरी-गणपतीच्या दिवसात जिल्हयातील या रेशनकार्डधारक कुटूंबांना 100 रुपयांमध्ये “आनंदाचा शिधा” रेशन दुकानांमधून मिळणार आहे. या किट पुरवठादारांकडून संबंधित तालुका गोदामात पुरवठा होताच रेशन दुकानदारांमार्फत पात्र लाभार्थ्यांना मिळेल.

गौरी-गणपती उत्सव व दिवाळी सणानिमीत्त जिल्हयातील अंत्योदय योजना व प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र कार्डधारक लाभार्थी यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानातुन “आनंदाचा शिधा” संच प्राप्त करुन घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीम. मनिषा खत्री यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरद पवार गटात 500 च्या वर कार्यकर्त्यांचा प्रवेश

Next Post

नंदुरबारला साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी क्रीडा प्रबोधिनी : डॉ. विजयकुमार गावित

Next Post
नंदुरबारला साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी क्रीडा प्रबोधिनी : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबारला साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी क्रीडा प्रबोधिनी : डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

July 27, 2026
शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add