शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे महिला आरोग्य व लिंग समानता या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
माजी विभागीय रासेयो समन्वयक डॉ. मृणाल जोगी यांनी लिंगभाव समानता व संवेदनशीलता या विषयावर रासेयो स्वयंसेवकांशी संवाद साधला. युवा हे प्रत्येक देशाचे भविष्य असून निरोगी व सशक्त युवा पिढी देशाच्या प्रगतीसाठी सक्रियपणे योगदान देत असतात. महिलांनी देखील आपल्या आरोग्याविषयी विशेष काळजी घेऊन प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान दिले पाहिजे. समाजातील विविध उदाहरणे देऊन डॉ. जोगी यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, उपप्राचार्य प्रा. एम. के. पटेल, डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी तरुणांच्या या शारीरिक व मानसिक विकासासाठीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. वर्षा चौधरी, डॉ. वजीह अशहर व रासेयो स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.








