नंदुरबार l प्रतिनिधी
रामायणापासून ते इंग्रज काळापर्यंतच्या प्रत्येक चांगल्या गोष्टींसोबत व लढ्यात देखील आदिवासी बांधवांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. इंग्रजांच्या काळात स्वातंत्र्य संग्रामात पहिला फाशीवर जाणारा स्वातंत्र्यवीर हा आदिवासी समाजाचा होता. असे प्रतिपादन दिल्ली येथील अखिल भारतीय नगरीय कार्य प्रमुख भगवान सहाय्य यांनी केले आहे.
देवगिरी कल्याण आश्रम मार्फत जनजाती गौरव या पुस्तिकेचे प्रकाशन कन्यादान मंगल कार्यालय येथे आदिवासी देवमोगरा शैक्षणिक संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित व प्रमुख वक्ते म्हणून दिल्ली येथील अखिल भारतीय नगरीय कार्यप्रमुख भगवान सहाय्य यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष गिरीश वसावे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्ते भगवान सहाय्य यांनी सांगितले की रामायणापासून ते स्वातंत्र्य पूर्व काळात देखील आदिवासी बांधवांचे योगदान व कार्य अतुलनीय असे आहे. त्याग आणि बलिदानाचे त्यांचे जीवन आहे. देशात यापूर्वी ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या आहेत किंवा कुठली चळवळ उभी राहिली आहे त्यात आदिवासी बांधवांच्या सिंहाचा वाटा आहे त्यामुळे भारतीयांच्या हृदयात त्यांचे आजही चांगले स्थान आहे. मात्र त्यांच्या इतिहासाने पाहिजे तशी दखल घेतली नाही. आदिवासी समाजातील देशात विविध ठिकाणी कार्य करणाऱ्या तसेच लढ्यात सहभागी झालेल्या विविध महापुरुषांच्या उल्लेख करीत त्यांच्याबद्दल सविस्तर अशी माहिती त्यांनी दिली. १५ नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती निमित्त देशभरात जनजाती दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नाने सर्वत्र हा दिवस साजरा होत आहे.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम मार्फत गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी बांधवांच्या हिताचे कार्य करण्यात येत आहे त्यांच्या मदतीसोबत त्यांच्या विकासासाठी सदैव वनवासी कल्याण आश्रम प्रयत्नशील आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्रकुमार गावित यांनी सांगितले की, जनजाती गौरव या पुस्तिकेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या इतिहास लोकांसमोर येईल त्यांनी केलेल्या या स्तुत्य अशा उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात आले तसेच वनवासी आश्रमा मार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमाचे त्यांनी माहिती दिली.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम मार्फत आदिवासी समाजाची संस्कृती परंपरा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच क्रांतिकारकांच्या सरकारमान्य इतिहास समोर आला नाही. तो समाजासमोर येण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि भारतीय वनवासी कल्याण आश्रम यांनी जनजाती गौरव या नावाने पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकात सर्व जनजाती कार्य क्रांतिकारकांच्या इतिहास लिहिला गेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शहर कार्यकारणी मार्फत करण्यात आले होते.
कार्यक्रमाला सुहास नटावदकर, नागेश पाडवी, मोहन खानवाणी, गणेश गावित, विठल म्याकलवार, यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवगिरी कल्याण आश्रम महाराष्ट्र राज्याचे प्रांत सहसचिव वीरेंद्र वळवी, कल्पेश पाडवी, मौल्या गावित, इनेश गावित, अशोक पाडवी, राजेंद्र बऱ्हाणपूरकर, हेमंत कदम, गिरीश बडगुजर, प्रा. संजय पाटील, प्रकाश जोशी, विनीत वाणी यांनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र वळवी यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रकाश पाठक यांनी केला, सूत्रसंचालन ॲड. प्रियदर्शन महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन गिरीश वसावे यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातून रसिक श्रोते उपस्थित होते.








