नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे लंपी स्किन डिसीज या साथरोगाने बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,उमर्दे खुर्दे ता.नंदूरबार येथील शेतकरी दिलीप शामराव मराठे यांच्या एक बैलाला गेल्या अनेक दिवसांपासून लंपी स्किन डिसीज या साथरोगाचे लक्षण दिसत होते.त्यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले.दरम्यान दिलीप मराठे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले.त्यानंतर 5 दिवसांपासून बैलावर उपचार सुरू असताना बैल मरण पावला.

दरम्यान आज बैलाच पंचनामा करण्यात आला.यावेळी सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर साळुंखे, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक एस व्ही लेंडे, शेतकरी दिलीप मराठे,अजय ठाकरे, अभिमन कदमबांडे आदी उपस्थित होते.
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे लंपी स्किन डिसीज या साथरोग असल्याने बैलावर उपचार सुरू असतानाही गावात लसीकरण करण्यात न करता कुठल्याही उपाययोजना झाल्या नसल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला.
नंदूरबार तालुक्यात दुष्काळ ग्रस्त स्थिती असताना एन हंगामात एका बैलाचा मृत्यू झाला.त्यामुळे शेतीची मशागत कशी करू असा गंभीर स्वर शेतकऱ्याचा निघत होता.या घटनेनंतर शेतकऱ्याला मोठा हादरा बसला असून रात्र भर झोप लागली नसल्याचे शेतकरी दिलीप मराठे यांनी सांगितले.








