नंदूरबार l प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंबड अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याच्या निषेधार्थ नंदूरबार येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू होते.यावेळी मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाला.
याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज नंदूरबार जिल्हा यांच्या तर्फे आज 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेला जगताप वाडी चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.दरम्यान जिल्हयात दुष्काळ ग्रस्त परिस्थिती असल्याने जिल्हा बंद मागे घेण्यात आल्याचे समन्वयक नितीन जगताप यांनी सांगितले.








