नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील कार्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख ॲड. यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. नूतन सरपंच पुनम महेंद्र पाटील यांच्या आमदार कार्यालयात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, जि.प सदस्य देवमन पवार,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील,नागो पाटील,माजी सरपंच भाऊसाहेब पाटील माजी सरपंच अशोक पाटील,उपसरपंच पाटील,नवीन बिर्ला, रमेश पाटील,महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.