म्हसावद। प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमच्या सुरुवातीला याहा मिगी माता यांच्या प्रतिमेचे पूजन करू दिप प्रज्वलित करण्यात आले.महिला जिल्हाध्यक्ष मंजुळा पाडवी यांच्या उपस्थितीत हा रक्षाबंधना चा उपक्रम संपन्न झाला.यावेळी सपोनि राजन मोरे यांच्यासह सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधल्या.यात युवती जिल्हाध्यक्ष तिथलं पावरा,जिल्हा जिल्हाध्यक्ष रेशमा पवार,मनीषा बेडसे,प्रमिला ठाकरे,नसीमा पटेल,सिमा चव्हाण,मडकानी च्या उपसरपंच जयनाबाई भिलावे,रत्ना बैसाणे,गुंता पिंपळे,भागा ठाकरे,राशीबाई ठाकरे,अनिता ठाकरे,रंजना मोरे,रमनबाई वसावे,
युवा जिल्हाध्यक्ष गोविंद भिलावे यांच्यासह परिसरातील राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी महिला उपस्थित होते.तसेच हवालदार जितेंद्र पाडवी,रामदास पावरा,सुनिल बागुल,छोटूलाल पावरा,बहादूर भिलाला,दादाभाई साबळे,मोहन साळवे,राकेश पावरा,हवालदार सूर्यवंशी यांच्यासह महिला पोलिस कर्मचारी उपस्थिती होती,