Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा कृषी महाविद्यालयात आंतर महाविद्यालय बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

team by team
August 29, 2023
in शैक्षणिक
0
शहादा कृषी महाविद्यालयात आंतर महाविद्यालय बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

शहादा l प्रतिनिधी

 

 

जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम व त्यागासोबत संस्कार आवश्यक असतात. कृषी शिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान व अनुभव आयुष्यभर उपयोगी ठरत असल्याचे प्रतिपादन युनियन बँकेचे शाखाधिकारी मयूर पाटील यांनी केले.

 

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील होते.

 

यावेळी कृषी महाविद्यालय पुण्याचे क्रीडा अधिकारी डॉ.अभिजीत नलावडे, प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, डॉ. एन.जे. पाटील, डॉ.एस. पी.पवार, प्राचार्य रवींद्र एस. पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

श्री.मयूर पाटील पुढे म्हणाले, आयुष्यात माणसाने माणूस म्हणून कसे जगावे हे कृषी शिक्षणातून कळते. कृषी शिक्षण परिपूर्ण माणूस घडविण्याचे कार्य करत असून माता आणि मातीचे कृषी शिक्षणाशी घट्ट नाते आहे.स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी तोंड व कान बंद ठेवणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.

 

 

प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले, मनातून पराभूत झाल्यावरच व्यक्तीची हार होते. मन खंबीर ठेवल्यास आपण जिंकणारच हा आत्मविश्वास असतो.
डॉ. पी. एल. पटेल म्हणाले, खेळात कोणीतरी पराभूत होत असतो म्हणूनच कुणीतरी जिंकतो.पराभवाने खचून जाऊ नये. खेळ असो वा जीवन जगणे यांत मूल्यांची जपणूक केली तर यश प्राप्त होत असते.प्रा. डॉ. नलावडे यांनीही मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपात जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

या स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातून मुले व मुली मिळून सुमारे साडेचारशे विद्यार्थी व पन्नास प्राध्यापक सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धा पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये संपन्न होत आहेत.दरम्यान,आज ऑगस्ट रोजी स्पर्धेचा समारोप प्रांताधिकारी सुभाष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

 

 

उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी दिनेश गिरासे याने केले. शपथ ग्रहण विद्यार्थी मयूर पाटील या विद्यार्थ्यांनी दिली. आभार विद्यार्थी कल्याण विकास अधिकारी प्रा. डॉ.भरत चौधरी यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

वाहन चालकांचे आरोग्य महत्त्वाचे – अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे

Next Post

श्री.वीर भगतसिंग व्यायामशाळेच्या गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

Next Post
श्री.वीर भगतसिंग व्यायामशाळेच्या गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

श्री.वीर भगतसिंग व्यायामशाळेच्या गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add