Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त 14 ऑगस्ट रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

team by team
August 11, 2023
in राजकीय
0
जात पडताळणी प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरविणार : डॉ. विजयकुमार गावित

नंदूरबार l प्रतिनिधी

 

 

ना.डॉ.विजयकुमार गावित साहेब वाढदिवस आयोजन समितीच्या वतीने राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दि.14 ऑगस्ट 2023 रोजी नंदुरबार-धुळे जिल्हा मर्यादित भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चार गटात होणार असून अनुक्रमे यश मिळविणार्‍या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देवुन गौरविण्यात येणार आहे.

 

नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांचा दि.15 ऑगस्ट 2023 रोजी साजरा होणार्‍या वाढदिवसानिमित्त दि.14 ऑगस्ट 2023 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ना.डॉ.विजयकुमार गावित साहेब वाढदिवस आयोजन समितीच्या वतीने दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी 7 वाजता नंदुरबार व धुळे जिल्हा मर्यादित भव्य मॅरेथॉन स्पर्धेला ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या विरल विहार निवासस्थानापासून  सुरुवात होणार आहे.

 

 

 

या स्पर्धेत मुले/मुली 8 वी ते 10 वीसाठी 5 कि. मी. पुरूष, अकरावी ते सिनीयर कॉलेज यासाठी 10 कि. मी. अंतर व महिला गट 11 वी ते सिनीयर कॉलेज 6 कि.मी. इतके अंतर आहे. निवासस्थानापासून यशवंत विद्यालय, जी.टी.पी. कॉलेज रोड, अंधारे चौक, महाराणा प्रताप चौक, बस स्टँड, नेहरू पुतळा, गांधी पुतळा, उड्डानपुल, गिरीवीहार गेट, स्वागत पेट्रोल पंप, करण चौफुली परत त्याचमार्गे ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या निवासस्थानापर्यंत येवून मॅरेथॉन स्पर्धेची सांगता होईल. या स्पर्धेत 11 वी ते सिनीयर कॉलेज पुरूषसाठी अंतर 10 कि.मी. व पारितोषीक प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये असे आहे. 11 वी ते सिनीयर कॉलेज महिलासांठी 6 कि.मी.  अंतर व पारितोषीक प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये व तृतीय दोन हजार रुपये असे असेल. 8 वी ते 10 वी मुलेसाठी 5 कि.मी.अंतर व पारितोषिक प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये तर तृतीय तीन हजार रुपये असे पारितोषिक राहील.

 

 

 

8 वी ते 10 वी मुलींसाठी 5 कि.मी अंतर व पारितोषिक प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय दोन हजार रुपये असे पारितोषिक असणार आहे. ज्या खेळाडूंना वरिल मॅरेथॉन स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल. स्पर्धेत भाग घेणारा खेळाडू नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील रहिवासी असावा. रहिवासी असल्याचा पुरावा म्हणुन आधारकार्ड आवश्यक आहे. खेळाडूंचे प्रवेश अर्ज दि.14/ऑगस्टपर्यंत मिनल वळवी (9822490693), सॅबस्टीन जयकर (9075360991), राजेश शहा (9423191312), निलेश गावीत (9764032903), जितेंद्र पगारे (9860545847), रविंद्र सोनवणे (9420085225), दिनेश सुर्यवंशी (9960245432), चेतना चौधरी (9420166918), धनराज अहिरे (8888440729), कबाडे (7745042326) या शिक्षकांकडे जमा करावेत.

 

 

 

स्पर्धा पुर्ण झाल्यावर एक तासानंतर सर्व गटातील विजयी तीन स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मान प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. विजयी झालेला खेळाडू जर नियम व अटींना पात्र ठरला नाही तर त्यास पारितोषिक दिले जाणार नाही. स्पर्धा पुर्ण करतांना काही तांत्रिक बाबी व अधिकार आयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन ना.डॉ.विजयकुमार गावीत साहेब वाढदिवस आयोजन समितीने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जगतज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाची स्थापना ;लिंगायत समाजात समाधान

Next Post

विश्व आदिवासी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम

Next Post
विश्व आदिवासी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम

विश्व आदिवासी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add