नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील सद्यस्थितीत रद्द असलेल्या व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन दुकान परवाना मंजुरीसाठी बचतगट, संस्था यांना 1 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकानुसार कळविले आहे.
नंदुरबार तालुक्यात 7, अक्कलकुवा 5, व शहादा 3 असे एकूण जिल्ह्यात 15 दुकानांसाठी नवीन जाहिरनामा काढण्यात आला असून प्रस्तावित रास्तभाव दुकान मंजूरीचे नियम व अटी शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संबंधित तहसिल कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय तसेच जिल्ह्याच्या www.nandurbar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही श्री. मिसाळ यांनी कळविले आहे.









