Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चॉंदसैली घाटात २८ जुलै ते २८ ऑगस्ट दरम्यान वाहतुक बंद;अत्यावश्यक सेवेतील वाहनांची वाहतुक सुरू राहील

team by team
July 26, 2023
in राज्य
0
चॉंदसैली घाटात २८ जुलै ते २८ ऑगस्ट   दरम्यान वाहतुक बंद;अत्यावश्यक सेवेतील वाहनांची वाहतुक सुरू राहील

नंदुरबार l प्रतिनिधी

रोषमाळ-कोठार तळोदा रस्त्यालगत चाँदसैली घाटात (कि.मी. ५६/८५० ते ६५/०० लांबी दरम्यान) सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घाटातील लांबीत गॅबियन व संरक्षक भिंत उभारण्याचे काम करण्यात येणार असल्याने २८ जुलै ते २८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता वाहतुक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

 

डोंगराळ परिसरात पावसामुळे किंवा भुस्खलनामुळे सदरच्या परिसरात घाटातून मोठ्या प्रमाणावर दगड व माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भविष्यात वित्तीय किंवा जिवीत हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे सदर मार्गावर धोकादायक वळणावर तसेच आवश्यक त्या ठिकाणी गॅबियन,संरक्षण भिंत करण्यासाठी या मार्गावरील अत्यावश्यक सेवा देणारी वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतुक बंद राहील.

 

या मार्गावर काही अनूचित प्रकार घडून अथवा भुस्खलन होवून अपघातात जिवित वा वित्तहानी होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा सार्वजनिक हित लक्षात घेता २८ जुलै २०२३ पासून ते २८ ऑगस्ट २०२३ पर्यंत रोषमाळ-कोठार-तळोदा चाँदसैली घाटात मार्गावरील होणारी वाहनांची वाहतूक बंद करून ती इतर मार्गाने वळविणे बाबत आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी जारी केले आहेत.

 

या मार्गावर फक्त अत्यावश्यक सेवेच्या रूग्णवाहिका, अग्नीशमक, गॅस सिलेंडर वाहतूक, अन्न व धान्य वितरण या सारख्या वाहनांसाठी वाहतुक सुरू राहिल. या मार्गावर उप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिशा दर्शक फलक आणि बॅरिगेटर्स लावून वाहतुक वळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून आवश्यकते नुसार पथकेही नियुक्त करावित. तसेच याठिकाणी जिल्हा पोलीस अधिक्षक आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरवतील. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या मार्गावरील रस्त्यांचे दुरूस्तीचे व गॅबियन व संरक्षण भिंतीचे काम मुदतीत करून या मार्गावर ज्या-ज्या ठिकाणी भुस्खलन व अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी दिलेल्या मुदतीत संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्याचेही श्रीमती खत्री यांनी आदेशात नमूद केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा उत्साहात

Next Post

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ जिल्हाभर कडकडीत बंद, दोन ठिकाणी बसवर दगडफेक

Next Post
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ जिल्हाभर कडकडीत बंद, दोन ठिकाणी बसवर दगडफेक

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ जिल्हाभर कडकडीत बंद, दोन ठिकाणी बसवर दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add