Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातील अंधारे चौकात भरधाव ट्रॅक्टर रुग्णालयाच्या भिंतीला धडकले, अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने चालकाचा मृत्यू

team by team
September 28, 2021
in क्राईम
0
नंदुरबार शहरातील अंधारे चौकात भरधाव  ट्रॅक्टर रुग्णालयाच्या भिंतीला धडकले,  अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने चालकाचा मृत्यू

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील मोठा मारूतीकडून भाजीमार्केटमध्ये कांद्यांनी भरलेल्या भरधाव वेगातील ट्रॅक्टवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर दुभाजक तोडून दवाखान्याचा भिंतीला धडकला. यात ट्रॅक्टर चालक चाकाखाली आल्याने त्याचे निधन झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील गजबजलेल्या मुख्य अंधारे चौकात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरचा थरार नागरीकांनी अनुभवला. नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील रमण रामा ठाकरे हा त्याच्या ताब्यातील लाल रंगाचे ट्रॅक्टर कांद्यांनी भरलेल्या ट्रॉलीसह मोठा मारूतीकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी घेवून जात असतांना त्याच्या ट्रॅक्टर भरधाव असल्याने त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. हे ट्रॅक्टर अंधारेचौक याठिकाणी असलेल्या शुभेच्छा बॅनवर धडकले. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या दुभाजक तोडत अंधारे हॉस्पिटलच्या भिंतीवर धडकले.यात ती भिंत पडली. यावेळी चालकाचा ट्रॅक्टरवरून तोल गेल्याने तो खाली पडला व ट्रॉलीचे मागील चाक त्याचा अंगावरून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्याठिकाणी हजर झाले. नंदुरबार शहरातील पोलीसांनी आपल्या वाहनातून रमण रामा ठाकरे (वय ३८) याला रूग्णालयात नेले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर याठिकाणी मोठया प्रमाणावर वाहतुक ठप्प झाली होती. पोलीसांनी ही वाहतुक सुरळीत केली. दरम्यान अंधारेचौकात कायमच वर्दळ असते. त्याठिकाणी अपघात झाला. तेथे रिक्षाच्या थांबा आहे. परंतु सुदैवाने याठिकाणी एकही रिक्षा नसल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पोलीस कॉस्टेबल प्रविण शांतीलाल पटेल यांच्या फिर्यादीवरून मयत रमण रामा ठाकरे याच्या विरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई स्नेहदिप शिंदे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

किर्तन करतांना किर्तनकार ताजुद्दिन महाराज शेख यांचे निधन

Next Post

शिवसेनेचे उमेदवार ॲड . राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत न्यायालयाने फेटाळली

Next Post
शिवसेनेचे उमेदवार ॲड . राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारी अर्जावर  हरकत न्यायालयाने फेटाळली

शिवसेनेचे उमेदवार ॲड . राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत न्यायालयाने फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add