धडगाव l प्रतिनिधी
मणिपूर राज्यात आदिवासी महिलांसोबत घडलेल्या अत्याचारा हा निंदनीय असून मनाला चटका देणारा आहे.सदरील घटनाही मानवतेला काळिमा फासणारी आहे संबंधित दोषींवर लवकरात लवकर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी धडगाव शहरातील भोई समाज सेवा संघ आणि भोई समाज युवा मंच यांच्या वतीने या घटनेचा निषेध करत तहसीलदार कल्पेश जाधव याना निवेदन देण्यात आले.
यावेळी भिकचंद शिवदे,रमण ढोले, लतेश मोरे, प्रल्हाद भोई, दीपक शिवदे, धनराज ढोले, संदीप सूर्यवंशी, मनोज वानखेडे,संकेश्वर ढोले,यतीश शिवदे, संजय साठे गौतम मोरे, निलेश साठे,नरेश वाडीले, सतीश बोरडे, जगदीश मोरे,काशिनाथ मोरे, जगदीश भोई, पंकज भोई, महेंद्र खेडकर , सतीश साठे,विशाल मोरे,सागर सोनार,योगेश साठे, संतोष रामोळे,पंकज सोनवणे,हर्षल शिवदे, मनीष साठे,यासोबत मोठ्या संख्येने समाज बांधवांनी निवेदन देत मणिपूर घटनेचा निषेध व्यक्त केला.








