Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रिंकी पावरा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी चीनला रवाना

team by team
July 25, 2023
in राष्ट्रीय
0
रिंकी पावरा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी चीनला रवाना

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील जी.टी.पाटील महाविद्यालयातील क्रीडा विभागाची विद्यार्थिनी रिंकी पावरा हिची नुकतीच विद्यापीठाच्या माध्यामातून आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झालेली आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

 

रिंकी पावरा ही मूळची धडगाव तालुक्यातील अति दुर्गम भागातील खेड्यातील विद्यार्थिनी आहे. ती सध्या जी. टी. पाटील महाविद्यालयात शिकत असून तिने महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदविला. रिंकी पावरा हिची आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निवड होण्यापूर्वी अश्वमेध विद्यापीठ स्पर्धेत रौप्य पदक, अंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत रौप्य पदक, अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत रजत पदक तसेच खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त करून दैदीप्यमान कामगिरी केलेली आहे.

 

 

तेथून तिची निवड चेंगडू, चीन येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी झाली आहे. आज ती दिल्ली विमानतळावरुन चीनला रवाना झाली आहे. महाविद्यालयाच्या विनंती नुसार रिंकी पावराचा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारा सर्व खर्च विशेष बाब म्हणुन क. ब. चौ. उ. म. विद्यापीठाने केला त्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी आणि विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील तसेच स्थानिक पातळीवर सर्व खर्च महाविद्यालयाने उपलब्ध करून प्रोत्साहन दिले त्याबद्दल रिंकीने आभार मानले.

 

 

रिंकी पावराने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल नं. ता. वि. समिती संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नं. ता. वि. समिती संस्थेचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एम. जे. रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले तसेच रिंकीची कामगिरी उत्कृष्ठ होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

मणिपूर अत्याचाराचा घटनेचा भोई समाजाच्या वतीने निषेध, धडगाव येथे तहसीलदारांना निवेदन

Next Post

नंदुरबार बंदला भारतीय जनता पार्टीचा जाहीर पाठिंबा

Next Post
नंदुरबार बंदला भारतीय जनता पार्टीचा जाहीर पाठिंबा

नंदुरबार बंदला भारतीय जनता पार्टीचा जाहीर पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add