नंदुरबार l प्रतिनिधी
मणिपूर येथील आदिवासी समाजातील दोन महिलांना नग्न अवस्थेत धिंड काढून सामुहीक बलात्कार केला. या घटनेमुळे देश हादरला आहे व माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) तर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आले.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर येथील आदिवासी समाजातील दोन महिलांना नग्न अवस्थेत धिंड काढून सामुहीक बलात्कार केला. या घटनेमुळे देश हादरला आहे व माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या संस्कृती प्रधान देशात अश्या घटना घडत आहेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. आपण स्त्रीला देवी म्हणणारे आणि मानणारे कुठे गेले? काय घडत आहे या देशात? नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करायचा, तेव्हा मोठे मोठे शब्द वापरुन स्त्री म्हणजे देवीचा, दुर्गेचा अवतार फक्त उपमा पुरतेच का? स्त्रीच्या बाबतीत अशा पध्दतीने वागणार्या नराधमांना तत्काळ अटक करुन कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हातर्फे करण्यात आली आहे.
निवेदन देतेप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, युवक जिल्हाध्यक्ष नितीप जगताप, महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा अनिता परदेशी, मंजुळा पाडवी, व्हीजेएनटी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, योगेश मराठे, एन.डी.पाटील, केसरसिंग क्षत्रिय, बाळासाहेब मोरे, राहुल पावरा, मिलीन जाधव, नरु जगताप, बिपीन पाटील, ईश्वर गावीत, इकबाल शेख,हितेश धिवरे,सचिन पावरा,सिमा चव्हाण, प्रमिला ठाकरे,सुनिल राजपूत, गोलु राजपूत, कुणाल पाडवी, प्रतिक पाटील, शुभम कुवर, मिरज शेख, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.








