नंदूरबार l प्रतिनिधी
युवक व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल खामगाव रोड नंदुरबार येथे करण्यात आले होते. स्पर्धेत 14, 17, 19 वयोगटात सर्व शाळांनी सहभाग घेतला यावेळी 17 वयोगटात चावरा इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.
यावेळी मुलींच्या संघात तनिष्का पगारे, ओझल वळवी, प्रियांशी भारती , प्रकृती पाटील, प्रयुक्त फाळके, सिमंतिनी चौधरी, रिद्धी पाटील,सृष्टी पाटील ,वेदिका पाटील, जीनल अग्रवाल ,पलक जैन ,प्रियांशी चौधरी,कृष्णाली बिरला, रितिशा कच्छानी,सृष्टी नांद्रे यांनी सहभाग नोंदविला आणि प्रथम क्रमांक मिळवला व विभाग स्तरावर मुलींचा संघ निवडण्यात आला.
विजयी खेळाडूंना क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या या यशस्वी खेळाडूंचे चावरा स्कूल संस्थेचे मुख्याध्यापक फादर टेनी फरक्का आणि उपमुख्याध्यापक फादर सिजिन व क्रीडाशिक्षक डॉ.दिनेश बैसाणे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.








