नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा येथील मेन बाजारात गुटखा विक्री करणाच्या उद्देशाने कब्जात बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा शहरातील मेन बाजारातील तेली गल्लीतील हरीओम स्वीट नावाच्या किराणा दुकानात विशाल मोहनदास झामनाणी (रा.सिंधी कॉलनी, नंदुरबार) हा मानी जिवितास धोका निर्माण होईल हे माहित असतांना विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगतांना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून २६ हजार ८४० रुपये किंमतीचा विमल पान मसाला व तंबाखूचे पाऊच, २ हजार ४८ रुपये किंमतीचा राज निवास सुगंधीत पान मसाल्याचे १६ पाऊच, ७६८ रुपये किंमतीचे जाफरानी जर्दा नावाचे १६ पाऊच, २ हजार ५२० रुपये किंमतीचे झी माझा तंबाखूचे ५५ नाव असलेले २१ डबे, १ हजार ८०० रुपये किंमतीचे मिराजचे ९ बॉक्स, ५ हजार ६०० रुपये किंमतीचे युवा गोल्ड तंबाखूचे १४ पाऊच असा एकूण ३९ हजार ९७६ रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोना.सुनिल तेजाबसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात विशाल झामनाणी याच्याविरोधात भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२), (४), ३० (२), (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.








