मोलगी l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड.अमरसिंग वसावे व अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड.अमरसिंग वसावे व लोकमान्य टिळकांच्या पोषखात आलेल्या विद्यार्थी अलीराज पाडवी व तन्वी वळवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना ईश्वर वसावे यांनी केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड.अमरसिंग वसावे यांनी लोकमान्य टिळकांचे गुण आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आवाहन केले. तसेच शाळेच्या शिक्षिका लीला पाडवी यांनी मनोरंजकपणे आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पोषखात आलेल्या विद्यार्थी अलीराज पाडवी व तन्वी वळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन प्रोत्साहनपर अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्याअंती कार्यक्रमाचे अध्यक्ष गोटूसिंग वळवी यांनी लोकमान्य टिळकांचे विविध सन्दर्भ देऊन बालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे उपप्राचार्य ईश्वर वसावे तर आभार लीला पाडवी यांनी मानले.








