नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादीतर्फे शनिमांडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य, सर्व रोगनिदान व नेत्र रोग तपासणी शिबिराचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील व तिलाली ग्रामपंचायतीच्या सरपंचा स्मिता पाटील यांनी केले होते. याप्रसंगी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, भाजप राज्य उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, राष्ट्रवादीचे राज्य युवक सचिव ॲड.राऊ मोरे, पं.स.सदस्या छाया पवार, राजेंद्र बाविस्कर, युवराज पाटील, अरुण पाटील, ताराबाई राजपूत, मोहन माळी, कमलेश चौधरी, माजी जि.प.अध्यक्ष वकील पाटील, जि.प.सदस्य मोहन शेवाळे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री अनिल पाटील म्हणाले,येत्या काळामध्ये राज्याच्या विकासासाठी भरीव प्रयत्न करण्यात येतील.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा.जिल्ह्यात डॉ.अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात राष्ट्रवादीचे संघटन आणखीन भक्कम होणार असल्याचा विश्वास श्री.पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान,सदर शिबिराचे आयोजन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते.








