म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील श्री.साईबाबा मंदिराच्या द्वारकामाई येथे पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस शेगडीचे वितरण करण्यात आले.
गॅस शेगडी चे वितरण खा. डॉ.हिना गावित,नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित व जि.प.च्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे यांच्या हस्ते १००० गॅस शेगडी चे वितरण करण्यात आले.
यावेळी खासदार हिना गावित,नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित व कृषी सभापती हेमलता शितोळे यांचा सत्कार ग्रुप ग्रामपंचायत तर्फे सरपंच युवराज ठाकरे, उपसरपंच सौ.सविता पाटील,सदस्य सचिन बेदमुथा,सदस्या स्नेहलता बेदमथा व माजी कृषी सभापती डॉ.भगवान पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ हिना गावित म्हणाले की, डॉ.विजयकुमार गावित हे आदिवासी मंत्री असल्याने त्यांनी २००४ पासून केंद्र सरकार च्या पंतप्रधान उज्वला गॅस दोन ही योजना सुरू केली आहे.त्यासाठी महिलांना या गॅस योजनेचा फायदा मिळत आहे केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत.त्या सर्व योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा तसेच केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या जिल्हा परिषद मार्फत प्रत्येक गाव पाड्यात पोहचविले जाणार आहेत तर शबरीबाई घरकुल योजना,रमाई घरकुल, अल्पसंख्याक घरकुल, भटक्या विमुक्त जमाती घरकुल, पंतप्रधान घरकुल अशा सर्व घरकुल योजनेची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तर अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदे मार्फत असलेल्या विविध योजनांची माहिती देत त्याचा सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले.
यावेळी मे.आदिराज गॅस एजन्सीचे रीना नाईक, नगरसेवक नानाभाऊ निकम ,सामाजिक कार्यकर्ते देविदास माळी, खेडदिगरच्या माजी सरपंच मंजुळाबाई मुसळदे,म्हसावदच्या उपसरपंच सौ.सविताबाई पाटील,माजी कृषी सभापती डॉ.भगवान पाटील,ग्रा.प.सदस्य सचिन बेदमुथा, सदस्या स्नेहलता बेदमुथा, जगदीश नाईक यांच्यासह म्हसावद व परिसरासह हजारो महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविक सुरेश ठाकरे यांनी केले तर सूत्र संचालन ग्रामविकास अधिकारी गिरासे यांनी केले.








