Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार पोलीस दलातर्फे अवैध मद्यासह 46 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

team by team
July 12, 2023
in क्राईम
0
नंदूरबार पोलीस दलातर्फे  अवैध मद्यासह 46  लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

नंदूरबार l प्रतिनिधी

 

अवैध विदेशी दारुच्या वाहतूकीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कारवाई करीत 18 लाख 70 रुपये किमतीच्या दारुसह एकुण 45 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.12 जुलै रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना एक पिकअप व एक इनोव्हा या वाहनांमधुन नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात अवैध दारू घेवून येणार आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यावरुन त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदर वाहनाची माहिती देवून, बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

 

मिळालेल्या बातमीच्या आधारे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे स्वतः त्यांच्या दोन वेगवेगळ्या पथकासह नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात रस्त्यावर सापळा रचला व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची बारकाईने तपासणी करीत असतांना 12 जुलै रोजी सकाळी 4.30 वा. सुमारास एक चारचाकी मोठे वाहन व त्याच्या पाठीमागे एक इनोव्हा वाहन भरधाव वेगाने येतांना दिसला, म्हणून पोलीस पथकातील अमंलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेले, म्हणून पथकाला संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. परंतु वाहन चालकास संशय आल्याने त्याने पोलीसांपासून काही अंतरावर वाहन उभे करून वाहन सोडून पळ काढला.

 

 

वाहन चालकांचा नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करुन शिवाजी बाबुलाल चौधरी रा. पडावद ता. शिंदखेडा जि. धुळे ह.मु. जगतापवाडी नंदुरबार यास ताब्यात घेण्यात आले. त्याचा एक साथीदार पळून गेला. महिंद्रा पिकअप वाहन ( क्र. एम.एच -39 सी-7306) या वाहनाची तपासणी केली असता त्यात 14 लाख 40 हजार 768 रू किंमतीचे एकुण 256 खाकी रंगाच्या पृष्ठाचे बॉक्स उघडुन पाहीले असता प्रत्येकी बॉक्स मध्ये रॉयल ब्लू व्हिस्की 180 एम.एल. पिगोट चापमन को असे लेबल असेलेले प्लॉस्टीकच्या सिलबंद बाटल्या एकुण 48 नग त्याचप्रमाणे एकुण 12 पॉलेथिन थैली प्रत्येकी थैली एकुण 48 नग नमुद वर्णनाच्या व्हिस्कीच्या बाटल्या अश्या एकुण सर्व 12 हजार 864 नग बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत 112 रुपये.

 

 

6 लाख रुपयांची महिंद्रा पिकअप वाहन (क्र.एम.एच.39- सी-7306) असे एकुण 20 लाख 40 हजार 768 रुपये किमतीचा सदर मुद्देमाल, पिकअप वाहन ही पोलीसांनी कायदेशीर प्रक्रीया करून ताब्यात घेतली. सदरची दारू कोणाची आहे ? याबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास विचारणा केली असता, त्याने सदरचा माल हा जगतापवाडी मध्ये राहणार मुकेश चौधरी याचा असल्या बाबत सांगीतले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडून मुकेश चौधरी याची माहिती घेवून त्याचा शोध घेतला असता तो जगतापवाडी येथे त्याच्या राहत्या घरून मुकेश अर्जुन चौधरी रा. म्हसावद, ता. शहादा, जि. नंदुरबार, ह.मु. जगतापवाडी, नंदुरबार ता जि नंदुरबार यास अटक केली. त्यावेळी त्याच्या घरासमोर उभी असेलेली टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा पांढऱ्या रंगाची (क्र. एम.एच-43- व्ही-6354) वाहनाबाबत विचारले असता सदरची गाडी ही त्याचीच असल्याबाबत सांगीतले.

 

 

तिची पाहणी केली असता त्यात 4 लाख 3 हजार 80 रू किंमतीचे एकुण 80 खाकी रंगाचे पृष्ठाचे बॉक्स त्यात प्रत्येकी बॉक्स मध्ये रॉयल ब्लू व्हिस्की 180 एम.एल. पिगोट चापमन को. असे लेबल असेलेले प्लॉस्टीकच्या सिलबंद बाटल्या एकुण 48 नग नमुद वर्णनाच्या व्हिस्कीच्या बाटल्या अश्या एकुण सर्व 3 हजार 840 नग बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत 112 रुपये कि. अं. प्रमाणे, 21 लाख रु टोयोटा कंपनीचे इनोव्हा ( क्र. एम.एच -43-व्ही -6354) असा एकुण -25 लाख 30 हजार 80 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांच्या वाहनातून एकुण 18 लाख 70 हजार रुपये किमतीची अवैध विदेशी दारु व 27 लाख रुपये किमतीचे दोन चारचाकी वाहने असा एकुण 45 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेले व पळुन गेलेल्या एका इसमाविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश् तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हवालदार जगदीश पवार, राजेश येलवे, दिपक गोरे, पोलीस नाईक भटु धनगर, बलविंद्र ईशी, स्वप्नील पगारे, नरेंद्र चौधरी, पोलीस अंमलदार किरण मोरे, इम्राण खाटीक, राहुल पांढारकर, अनिल बडे, युवराज राठोड यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जवाहर नवोदय विद्यालयायाच्या सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे

Next Post

रवी राणाच्या बेताल वक्तव्याचा नंदुरबार जिल्हा युवासेनेतर्फे निषेध

Next Post
रवी राणाच्या बेताल वक्तव्याचा नंदुरबार जिल्हा युवासेनेतर्फे निषेध

रवी राणाच्या बेताल वक्तव्याचा नंदुरबार जिल्हा युवासेनेतर्फे निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add