Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शरद पवारांचे हात अजून बळकट करण्यासाठी कटिबद्ध : महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे 

team by team
July 10, 2023
in राजकीय
0
शरद पवारांचे हात अजून बळकट करण्यासाठी कटिबद्ध : महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे 
नंदूरबार l प्रतिनिधी
शिंदखेडा येथील काकाजी मंगल कार्यालयात नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली होती.
उपस्थितांना संबोधित करताना संदीप बेडसे म्हणाले की, राज्यात सुरु असलेल्या पक्षफुटी च्या घटना ह्या राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकाची कटकारस्थाने आहेत. आधी शिवसेना पक्षात फुट पाडली त्यावरही राज्यातील येणाऱ्या निवडणुकीची गणिते जुळत नसल्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित दादांच्या माध्यमातून फुट पाडण्याचे काम शिंदे फडणवीस सरकारने केले. असे असुनही आपले दैवत शरदचंद्रजी पवार तसुभरही डगमगले नाहीत.
उलट त्याच जिद्दीने आणि बुद्धी चातुर्याने पुन्हा महाराष्ट्र पिंजुन काढण्यासाठी दौऱ्यावर निघाले आहेत. आपल्याला येणाऱ्या काळात शरदचंद्रजी पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हात अजुन बळकट करण्यासाठी परिस्थितीचा सामना करून पक्ष पुन्हा एकदा सत्तेवर आणायचा आहे आणि त्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सुतोवाच केले.
मी २०१४ पासून विधानसभा, २०१८ विधानपरिषद आणि परत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पडत्या काळापासूनच आजपर्यंत भाजपाविरोधात पक्षाशी एकनिष्ठ राहुन लढत आहे. संकटे प्रत्येकावर येतात तसे माझ्यावरही आले परंतू मी परिस्थितीचा सामना करून पक्षासाठी या संकटांवर मात करून भाजपाविरोधात लढा देत राहील अशी ग्वाही देतो.
कालपरवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले आमचे मित्र यांनी कालच्या त्यांच्या बैठकीत असे सुतोवाच केले  की, मला आमदार जयकुमार रावळांनी निवडणुकीसाठी आयात केले आहे. खरे तर मला त्यांच्या बुद्धीची कीव येतेच येते पण हसु देखील तितकेच येते. त्यांना माहीत नाही कि आजचा मतदार हा पुर्वीसारखा अज्ञान राहीलेला नाही. हा मतदार उघड्या डोळ्यांनी सर्व पाहत आहे हे आपण विसरलात. मी आयात उमेदवार असतो तर स्वतःवर आर्थिक संकटे घेऊन परिवाराला वाऱ्यावर न सोडता एशोआरामात राहीलो असतो.
पक्षासाठी स्वताचा खिसा खाली केला नसता. तुम्ही २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून  गद्दारी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले. आपण त्यावरही थांबलात नाही, २०१९ ला तर आपण स्वता रावळांच्या मांडीवर जाऊन बसलात हे आपण जरी विसरलात पण मतदारसंघ उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. भाजपात जाऊन तुम्ही जिल्हा परिषद सदस्यता मिळवली.
आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कालपरवाच प्रवेश केला तेवढ्यात अजित दादांच्या गटासोबत जाऊन पुन्हा जयकुमार रावळांच्या दुसऱ्या मांडीवर बसण्याचे स्वप्न आपण पुर्ण केलेत त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देत खंत संदीप बेडसे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केली.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भदाणे, जिल्हा परिषद सदस्य ललीत वारुळे, विठ्ठलसिंग गिरासे, आधार आबा पाटील, प्रभारी शिंदखेडा तालुकाध्यक्ष डॉ.कैलास ठाकरे, प्रभारी दोंडाईचा शहराध्यक्ष ॲड.एकनाथ भावसार, प्रभारी शिंदखेडा शहराध्यक्ष प्रविण पाटील, युवक तालुकाध्यक्ष मिलिंद देसले, पंचायत समिती सदस्य दिपक पाटील,  बलवंत  सिसोदे, राजु देशमुख, कय्युम दादा, प्रकाश मालपुर, भानु  कुरूकवाडे,  राजु गोराणे, संजय मोरे खर्दे, बिलाल बागवान, गणेश चकणे, कमलाकर बागले, डॉ. शांताराम पाटील पढावद, आनंदराव पाटील धमाणे,
भुषण पाटील, दादाभाई कापुरे, तनु देसले खलाणे, दुर्गेश पाटील, पिंटु खंडाळे, युवराज चव्हाण बळसाणे, शिवा खंडाळे,  देविदास मोरे शेवाळे,भालचंद्र पाटील पाष्टे, योगेश पाटील शेवाळे, योगेश पाटील उभंड सरपंच, गुलाब पाटील चिलाणे, बाळा सिसोदे नरडाणा, सतिष बेहेरे वारूळ, पंकज सोनवणे वारुळ, कपिल पाटील पाष्टे, फिरोज पटेल जातोडा, भुरा आण्णा पिंप्राड, भैय्या पाटील अमराळे, पिरण सिसोदे नरडाणा, अशोक सोनवणे दोंडाईचा, नरेश कोळी शेंदवाडे, अमोल पाटील डांगुर्णे, भुषण पाटील कमखेडा, राहुल पाटील अक्कडसे, हंसराज पाटील हिसपुर, मित्तल बेहेरे विरदेल, शानाभाऊ कोळी वरूळ, शैलेश ईशी मांडळ, पंकज कदम गोराणे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी  संदिप बेडसे यांची नियुक्ती

Next Post

ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच निवडीसाठी पठ्याने केली थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post
ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच निवडीसाठी पठ्याने केली थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच निवडीसाठी पठ्याने केली थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add