Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्रातर्फे युवा उत्सव २०२३ साजरा

team by team
July 9, 2023
in शैक्षणिक
0
नेहरू युवा केंद्रातर्फे युवा उत्सव २०२३ साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी

भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र नंदुरबार यांच्या वतीने युवा महोत्सव संपन्न झाला.
या महोत्सवाचे उद्घाटन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल व भारतीय मानक ब्युरोचे सह-संचालक सत्येंद्र पांडेय यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. अमोल बागुल यांनी आपल्याभाषणात युवकांनी आपली भाषा  संस्कृतीचे जतन व संवर्धन केले पाहिजे. अशा सांस्कृतिक कार्याक्रमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले पाहिजे. असे प्रतिपादन  केले.
युवा उत्सवाचा समारोप जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
त्यांनी  आपल्या समारोपीय भाषणात स्पर्धकांचे कौतुक केले. आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील युवकांमध्ये वेगवेगळे कलागुण आहेत‌. युवकांनी देश पातळीवर जिल्ह्याचे नाव लौकिक केले पाहिजे आणि यासाठी असे मंच आपल्यासाठी उपलब्ध असतात आपण याचा उपयोग केला पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे होते.
यावेळी  पोलीस उपअधिक्षक संजय महाजन, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
युवा महोत्सवात  समूह नृत्य, चित्रकला, मोबाईल फोटोग्राफी, वक्तृत्व, काव्य लेखन  या पाच कला प्रकारात १२१ युवक व १०३ युवती असे एकूण २२४ स्पर्धकांनी नोंदणी केली होती.
सदर महोत्सवास सायबर गुन्हे शाखा नंदुरबार, जिल्हा आरोग्य केंद्रातील एड्स नियंत्रक विभाग, जिल्हा क्रीडा विभाग, भारतीय मानक ब्युरो, तंबाखू नियंत्रण विभाग, या विभागांनी युवकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र लावले होते.
युवा महोत्सवाचे आयोजन नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी अशोककुमार मेघवाल यांनी केले. तर संयोजन कार्यक्रम अधिकारी सुनील पंजे यांनी केले. महोत्सव यशस्वितेसाठी परीक्षकांनी विशेष परिश्रम घेतले..
बातमी शेअर करा
Previous Post

इंटरनॅशनल मॅथ्स ओलंपियाड परीक्षेत श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

नंदूरबार येथे भाजपाने मनविला हिंदू विजय उत्सव

Next Post
नंदूरबार येथे भाजपाने मनविला हिंदू विजय उत्सव

नंदूरबार येथे भाजपाने मनविला हिंदू विजय उत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add