Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प.साठी १३२ तर पं.समितीसाठी ८२ इच्छुक, आज अर्ज माघारीनंतर चित्र होणार स्पस्ट

team by team
September 26, 2021
in राजकीय
0
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

नंदुरबार| प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी पोट निवडणुक प्रक्रिया घेण्यात येत आहे. काल अखेपर्यत जिल्हा परिषदसाठी १३२ तर पंचायत समितीसाठी ८२ इच्छुक रंगणात आहेत. उद्या दि.२७ रोजी माघारीची अंतिम मुदत असून राजकीय नेत्यांकडून इच्छकांच्या माघारीसाठी मनधरणी करण्यात येत आहे. उद्या माघारीनंतर सायंकाळपर्यंत रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.असे असले तरी प्रचाराचा धुराळाचा उडणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत ११ जि.प. गट व १४ पं.स.गणातील सदस्यांच सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. सदर सदस्यांच्या निवडीसाठी सुरवातीला पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर छाननीअंती आहे. त्यास्थितीत निवडणुक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यावेळी जिल्ह्यातील ११ जि.प. गटांसाठी १३२ तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी ८२ नामांकन वैध ठरली होती. छाननीअंती अक्कलकुवा गटात तर कोराई गणात एक नामाकंन अवैध ठरले होते. उर्वरीत सर्व नामांकन वैध ठरविण्यात आले होते. त्यानंतर दि.१३ सप्टेंबर रोजी राज्य निवडण्ुक आयोगाने निवडण्ुका घेण्यास हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार पोटनिवडणक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
उद्या दि.२७ सप्टेंबर रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. अद्यापावेतो इच्छुकांमधुन कोणीही माघार घेतली नसल्याने राजकीय पदाधिकारी व नेत्यांकडून इच्छुकांची माघारीसाठी मनधरणी करण्यात येत आहे. काही गट व गणांमध्ये राजकीय नेत्यांचे कुटूंबिय निवडणुक लढवित असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे पोटनिवडणुक प्रक्रिया घेण्यास निवडणुक आयोगाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर ज्या त्या गट व गणांमध्ये प्रचाराला सुरूवात झाली आहे. होम टू होम प्रचारावर इच्छुकांकडून भर देण्यात येत आहे. काही इच्छुक अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम असल्याने त्यांच्याकडून प्रचाराला जोर देण्यात आला आहे. उद्या दि.२७ सप्टेंबर रोजी माघारीनंतर रिंगणातील खर्‍या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यातच राजकीय नेते नेमके इच्छुकांच्या माघारी घेण्यात कितपत यशस्वी होतात. हे देखील उद्याचा समजणार आहे. जल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी पोट निवडणुकीसाठी दि.५ ऑक्टोंबर रोजी मतदान तर दि.६ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तीन हजारावर प्रकरणे निकाली, चार कोटी रुपये वसुल

Next Post

नंदुरबार येथे हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास एकास अटक

Next Post

नंदुरबार येथे हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

May 8, 2026
विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add