नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबारचे तहसीलदार पुलकित सिंग ॲक्शन मोड मध्ये आले असून त्यांनी तालुक्यातील शेकडो क्विंटल धान्य जप्त करीत अनेक दुकाने सिल केली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.6 जुलै 2023 रोजी संध्याकाळी धानोरा ता. नंदुरबार येथील प्रो. धनेश मोहनदास सेवलानी रा. नंदुरबार श्री. शनेश्वर ट्रेडींग, अन्न धान्य विक्री दुकानाची तहसिलदार पुलकित सिंग नंदुरबार यांनी अचानक तपासणी केली असता त्याठिकाणी शासनाची कोणतीही परवानगी न घेता अथवा कोणताही परवाना नसतांना 293 क्विंटल गव्हाचा साठा आढळुन आला.
म्हणून सदर दुकान सिल करुन श्री. शनेश्वर ट्रेडींग, अन्नधान्य केंद्र संचालक धनेश मोहनदास सेवलानी यांनी किरकोळ मर्यादा पेक्षा जास्त गहु साठा साठवणुक 293 क्विटल आढळुन आल्याने त्यांच्या विरुध्द जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 अन्वये कारवाई करण्यांत येत आहे.
तसेच दि. 7 जुलै 2023 रोजी सकाळी 10.00 वा. धानोरा बस स्टॉपच्या जवळील शिव शंकर निवासच्या तळमजल्यावर चंद्रकांत पुंजाराम चौधरी यांच्या घरात 328 क्विटल गहु व त्यांच्या नांवे असलेले दुकानात 9 क्वि. 30 कि. गहू व तांदुळ 5 क्वि. 66 किलो तांदुळ अवैध रित्या कोणताही परवाना न घेता साठवणुक करुन ठेवल्याचे आढळुन आले म्हणून चंद्रकांत पुंजाराम चौधरी व हिरामण पुंजाराम चौधरी रा. धानोरा ता. नंदुरबार यांच्या विरुद्ध जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 अन्वये कारवाई करण्यांत येत आहे.
तसेच चंद्रकांत पुंजाराम चौधरी व हिरामण पुंजाराम चौधरी रा. धानोरा ता. नंदुरबार यांच्या शिवसागर ट्रेडींग धान्य खरेदी विक्री केंद्र डीडीसी बँक च्या समोर असलेल्या शॉपींग सेंटरच्या 3 गाळया मध्ये 583.00 क्विंटल सोयाबीन साठा देखील आढळुन आलेला आहे.तो देखील सिल केलेले आहे. परवाना धारकाचा लेखी खुलासा घेवुन त्यांच्या विरुद्ध उचित कारवाई करण्यांत येईल.
तसेच धानोरा येथील जि. प. शाळा जवळील मदनलाल बनवारीलाल अग्रवाल यांच्या मालकीच्या गोदामाची तपासणी केली असता त्याठिकाणी गहु 45 क्विटल, बाजरी 6 क्विंटल व ऐरंडी 40 क्विटल व मका 50 क्विटल आढळुन आलेले आहे. त्याबाबत मदनलाल बनवारीलाल अग्रवाल यांचा देखील लेखी खुलासा घेण्याचे कारवाई सुरु आहे. तसेच मुख्य बाजारातील ताराकाशेठ यांच्या नांवे असलेल्या धान्य दुकानाची तपासणी करण्यांत आली व त्यांचा देखील लेखी खुलासा घेवुन त्यांच्या विरुध्द उचित कारवाई करण्यांत येईल असे तहसीलदार पुलकित सिंग यांनी सांगितले.









