नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून राजापूर ता. नंदुरबार येथील शेतकऱ्याच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सूरक्षा सानुग्रह अनूदान योजनेअंतर्गत २ लाख रुपये मंजूर झालेले आहेत.
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात त्याचप्रमाणे अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते.
राजापूर ता.नंदुरबार येथील अजमल रामजी पवार (वय ३८) यांच्या लॉकडाऊन कालावधीत नवापूर जवळ मोटरसायकल अपघात झाला होता. उपचार सुरू असतांना ते मयत झाले होते. संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शेतकऱ्यास मदत मिळऊन देण्यासाठी शासन स्तरावर वेळोवेळी पाठवा केला. मयत अजमल पवार यांच्या गोपीनाथ मुंडे अपघात सूरक्षा सानुग्रह अनूदानाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना २ लाखाच्या धनादेश देण्यात आला.यावेळी राधाबाई अजमल पवार, राजापूरचे सरपंच रविंद्र गावित,उपसरपंच मूकेश पवार, तेजमल राठोड, चरणदास पवार, प्रविण गावित, वसंत पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.








