नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरोतील पुरुषोत्तम मार्केटमधील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले.
शहादा शहरातील पुरुषोत्तम मार्केट मधील गाळा क्र.४४ व ४५ मधील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी ३ हजार ४१४ रुपये किंमतीचे ८ नग परिधान करण्याच्या पॅन्ट, १ हजार ४७२ रुपये किंमतीचे अंडरवियर, २० हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल, ३ हजार ५०० रुपये किंमतीचा सीसीटीव्ही फुटेज साठविण्याचा डीव्हीआर, १ हजार रुपये किंमतीचे इंटरनेट वायफाट राऊटर व ५०० रुपयांची रोकड असा एकूण ४८ हजार ८२६ रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले.
याबाबत दिनेश राजाराम पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








