नंदूरबार l प्रतिनिधी
कमला नेहरू कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा. प्रकाश पाठक सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणेमार्फत 26 मार्च 2023 ला घेतलेल्या सेट परीक्षेत भूगोल विषयात खुल्या प्रवर्गातील विशेष प्रावीण्य ने सेट उत्तीर्ण झाले.
त्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता अजमेरा,सचिव अम्रिता अजमेरा,प्रशासकीय अधिकारी अशोक गोपाळ चौधरी आणि कनिष्ठ महाविद्यालय च्या प्राचार्या वंदना पाटील उप प्राचार्य पवार, नरेंद्र बोरसे ,प्रा.खीवसरा, प्रा.सचिन पाटील व सहकारी यांनी केले, त्यांना जोगणीपाडा येथील प्रा.किशोर पाटील व विजय पाटील याचे मार्गदर्शन लाभले.








