नंदुरबार l प्रतिनिधी
माहे जून २०२३ देय जुलै २०२३ च्या निवृत्तीवेतनासोबत सातव्या वेतन आयोगातील फरकाचा चौथा हप्ता नियमित जमा होणार आहे. असे प्रतिपादन जिल्हा कोषागार अधिकारी भिमराव महाले यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात
आयोजित केलेल्या निवृत्ती वेतन धारकांच्या आडचणीचे निराकरण मेळाव्यात बोलतांना केले.
जिल्हा कोषागार कार्यालयात मंगळवारी राज्यशासकीय निवृत्तीवेतन धारकांच्या व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात निवृत्तीवेतन धारकांचा महागाई भत्ता वाढ, वयाच्या ८० वर्षानंतर होणारी वाढ, निवृत्ती वेतन धारकांचे अनुज्ञेय लाभ, सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता, हयातीचा दाखला, या विषयावरील अडचणीबाबत जिल्हा कोषागार अधिकारी भिमराव महाले, व अप्पर कोषागार अधिकारी विजयसिंग पाटील
यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्यास अप्पर कोषागार अधिकारी विजयसिंग पाटील,उपलेखापाल र.चं.पवार,लेखा लिपीक राजेश गांगुर्डे,संदिप आहिरे,राहूल चत्तर,निवृत्ती वेतनधारक संघटनेचे अध्यक्ष मधुकर साबळे, सचिव दिलीप
पाटील, रवींद्र पेंढारकर ,तळोदयाचे के.आर.गोसावी,मोतीलाल ठाकूर,यु.जी.पिंपरे,लालसिंग परदेशी,काशिनाथ राठोड, केशरसिंग क्षत्रिय असे ४० निवृत्ती वेतनधारक उपस्थित होते.








