Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई : पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

team by team
June 28, 2023
in क्राईम
0
अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई : पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
 29 जुन 2023 रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवाच्या अनुषंगाने  27 जुन 2023 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथील संवाद हॉल येथे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
शांतता समितीच्या बैठकीच्या सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी शांतता समितीचे जेष्ठ सदस्य कांतीलाल टाटीया व मौलाना जकेरीया यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तसेच उपस्थित इतर सदस्यांचा अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी शांतता समितीच्या सदस्यांचे स्वागत केले. नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने दोन्ही सण सौहार्दाचे व शांततेच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन केले.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी बैठकीच्या सुरुवातीला मुस्लिम बांधवांनी स्वत:हून आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेवून एक चांगला पायंडा असून त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे समाजात जातीय सलोख्याचा चांगला संदेश जात असल्याचे सांगितले. दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने समाजकंटकांकडून फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍ़प इत्यादी समाज माध्यमातून अफवा पसरवून सामाजिक शांतता बिघडवण्याची कृती करणाऱ्या समाज विघातक वृत्तींवर पोलीस दलाचे विशेष लक्ष असून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गैर केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी देखील आपआपल्या स्तरावर अशा वृत्तींना शोधून त्यांच्या हालचालींबद्दल पोलीस विभागास आगाऊ माहिती देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
बैठकी दरम्यान अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय संजय महाजन, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच शांतता समितीचे सदस्य कैलास चौधरी, प्रा. मेहमुद खाटीक, निसार मौलाना, मौलाना जकेरीया, कांतीलाल टाटीया, लक्षमण माळी यांनी आगामी सण / उत्सव व सामाजिक सलोखा राखणेबाबत मनोगते व्यक्त करुन शांतात समितीच्या सदस्यांच्या वतीने काही सूचना / अडचणी यावेळी मांडण्यात आल्या, त्यावर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी त्याचवेळी त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. शांतता समितीच्या या बैठकीत मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवाच्या भावनांचा आदर राखत पुढाकार घेवून संपूर्ण जिल्ह्यात आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी करणार नसल्याचे स्पष्ट केले.
तसेच पोलीसांच्या वेळोवेळी  करण्यात येणाऱ्या आवाहनाला मुस्लिम समाजाचा पाठींबा असल्याचे व पोलीस प्रशासनास योग्य ती सर्व मदत करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. सदर बैठकीस नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य कैलास चौधरी, प्रा. मेहमुद खाटीक,  निसार मौलाना, मौलाना जकेरीया, कांतीलाल टाटीया, लक्ष्मण माळी यांच्यासह 25 ते 30 सदस्य उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

निल पेेंढारकरचे नवोदय पात्रता परिक्षेत यश

Next Post

कत्तलीसाठी अवैधरीत्या बांधून ठेवलेले 10 लाखांचे गोवंश जनावरांची नवापूर पोलीसांकडून सुटका

Next Post
सिंदगव्हाण येथे जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा

कत्तलीसाठी अवैधरीत्या बांधून ठेवलेले 10 लाखांचे गोवंश जनावरांची नवापूर पोलीसांकडून सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add