Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कत्तलीसाठी अवैधरीत्या बांधून ठेवलेले 10 लाखांचे गोवंश जनावरांची नवापूर पोलीसांकडून सुटका

team by team
June 28, 2023
in क्राईम
0
सिंदगव्हाण येथे जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सवांच्या काळात किरकोळ कारणांवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अवैध जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक, खरेदी विक्री होणार नाही याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मा. डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या आदेशान्वये दि. 26 जुन रोजी रात्री 11 ते 27 जुन रोजीच सकाळी 5 वाजे दरम्यान कोंबिंग / नाकाबंदी ऑपरेशन राबविणेबाबत आदेशीत करण्यात आले होते. कोंबिंग / नाकाबंदी ऑपरेशन दरम्यान इतर प्रकारच्या अवैध धंद्यांबरोबरच कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक होणार नाही याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले होते.
दि. 26 जुन रोजी रात्री नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवापूर शहरातील ईस्लामपुरा भागात कत्तलीसाठी अवैधरीत्या जनावरांना बांधून ठेवलेले आहे. सदरची माहिती त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर वारे यांना सांगून पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.
त्याअनुषंगाने नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर वारे व त्यांच्या पथकाने नवापूर शहरातील इस्लामपुरा कसाईवाडा परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबविले असता वेगवेगळ्या ठिकाणी लहान बंदीस्त खोल्यांमध्ये 9 लाख 67 हजार रुपये किमतीची 128 गोवंश जनावरे बांधलेल्या अवस्थेत मिळून आले. मिळून आलेल्या सर्व जनावरांची पोलीस पथकाने सुटका करुन त्यांची तातडीने चारापाण्याची व्यवस्था केली. सुटका केलेल्या जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आलेले आहे. जनावरांना कत्तलीसाठी बांधून ठेवणाऱ्या इसमांविरुध्द नवापूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पशु संरक्षण  अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच नंदुरबार शहरातील साक्री नाका येथे लावलेल्या नाकाबंदी दरम्यान एक आयशर वाहन (क्र.एम.एच.18, ए-9801) यात 94 हजार रुपये किमतीच्या 13 जनावरांची अवैध वाहतूक करतांना मिळून आला. म्हणून आयशर वाहन चालकाविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जनावरांना पांजरपोळ येथे दाखल करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे नंदुरबार शहरात गोमांसाची वाहतूक करणाऱ्या संशयीताकडून 3 हजार 200 रुपये किमतीचे गोमांस तसेच शहादा शहरात गोमांसाची वाहतूक करणाऱ्या संशयीताकडून 5 हजार 600 रुपये किमतीचे गोमांस जप्त करुन दोन्ही इसमांविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्याला गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक अशोक मोकळ, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, दिनेशकुमार वसुले, पोलीस नाईक सुरेंद्र पवार, अमोल जाधव, प्रेमचंद जाधव पोलीस अंमलदार विक्की वाघ, दिनेश बावीस्कर, रणजित महाले, गणेश बच्छे, पवन काकरवाल, प्रमोद पाटील, समाधान केंद्रे, हेमंतकुमार महाले, किशोर वळवी यांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई : पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

Next Post

तहसीलदार पुलकित सिंह यांनी यांचा नंदूरबार शहरासह तालुक्यासाठी हा दिला इशारा

Next Post
नंदुरबारचे प्रभारी तहसिलदार पुलकित सिंह यांचा पुन्हा कारवाईचा धडाका, अनेकांनी घेतली धास्ती

तहसीलदार पुलकित सिंह यांनी यांचा नंदूरबार शहरासह तालुक्यासाठी हा दिला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add