नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील नळवा गावाच्या फाट्याजवळ भांडणाची कुरापत काढून दोन गटात वाद झाल्याने दोघे जखमी झाले असून परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील करणखेडा येथील आकाश नटवर नाईक व रविंद्र राजू पाडवी यांना भांडणाची कुरापत काढून गणेश सिताराम पाडवी, गजाना अरुण पाडवी, वेडू सिताराम नाईक, दीपक चैत्राम नाईक, श्रीनाथ जगन्नाथ पाडवी व विवेक जितेंद्र पाडवी यांनी रस्त्यात अडवून काठीने मारहाण केली.
तसेच दगड मारुन फेकल्याने आकाश नाईक व रविंद्र पाडवी यांना मुक्कामार लागला व शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत आकाश नाईक यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात भादंवि कलम ३२४, ३४१, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. राम वळवी करीत आहेत. तसेच वेडू सिताराम पाडवी यांनी परस्पर फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की,
भांडणाची कुरापत काढून वेडू पाडवी यांना आकाश नटवर नाईक, रविंद्र राजू पाडवी यांनी दगडाने व हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत वेडू पाडवी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५, १३४ (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.राम वळवी करीत आहेत.








