नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील मुंदलवड येथे शेतीच्या हिस्से वाटणीवरुन वडील-मुलास मारहाण केल्याप्रकणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील मुंदलवड येथील जहांगिर टेट्या वळवी व फेरांग्या सेंड्या वळवी यांच्यात शेती हिस्से वाटणीवरुन वाद होता. सदर वादातून जहांगिर टेट्या वळवी यांना फेरांग्या वळवी याने दगडाने मारहाण करुन दुखापत केली. तसेच जहांगिर वळवी यांच्या मुलास हिंमत फेरांग्या वळवी व मधु फेरांग्या वळवी यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत जहांगिर वळवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.दीपक वारुळे करीत आहेत.








