Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

 शोरुममध्ये कार दाखविताना घडला अपघात, कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

team by team
June 24, 2023
in क्राईम
0
 शोरुममध्ये कार दाखविताना घडला अपघात, कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील टाटा मोटर्स कंपनीच्या शोरूम मध्ये २१ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ग्राहकाला टाटा कंपनीचे चारचाकी वाहत दाखवत असताना अनावधानाने सेल्स एक्झिक्युटिव्ह च्या माध्यमातून एक अपघात झाला या अपघातात शोरूम मधीलच कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  २१ जून २०२३ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास टाटा शोरूम मध्ये सेल्स एक्झिक्यूटिव्ह दीपक इंद्रसिंग राजपूत हे आलेल्या ग्राहकांना टाटा कंपनीची कारची माहिती देत असताना अनावधानाने कार सुरू झाली व एक्सीलेटर जोरात दिल्या गेल्याने दुसऱ्या कार वर जाऊन आदळली या अपघातात कारची साफसफाई करणारा कर्मचारी जितेंद्र वसंत शिरसाठ (वय ४२ वर्ष ) हे कारमध्ये दबले गेले. यात ते गंभीर जखमी झाले त्यांना त्याच अवस्थेत शोरूम मधील कर्मचाऱ्यांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जितेंद्र वसंत शिरसाठ यांना मृत घोषित केले याप्रकरणी २२ जून २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सुभाष भगवान बच्छाव रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, शहादा यांच्या फिर्यादीवरून टाटा शोरूम मधील सेल्स एक्झिक्यूटिव्ह दीपक इंद्रसिंग राजपूत  रा. लक्ष्मी नगर नंदुरबार यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०४ अ २७९,३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार जगदीश पवार करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

आ.आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन घंटा गाड्यांचे लोकार्पण

Next Post

नंदूरबार येथे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

Next Post
नंदूरबार येथे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

नंदूरबार येथे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add