नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकडून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूलकुमार पवार यांची तळोदा येथे तर विसरवाडी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी नियंत्रण कक्षात अशा ५ पोलिस अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत.
नंदुरबार जिल्हा पोलिस दलामार्फत पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूलकुमार दत्तात्रय पवार यांची तळोदा पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस निरीक्षक पवार यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असतांना अनेक गुन्हे उघडकीस आणल्याची कामगिरी केली आहे. तसेच म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलिसनिरीक्षक निवृत्ती गंगाराम पवार यांची जिल्हा पोलिस मुख्यालयातील वाचक शाखेत
तर शहादा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गणेश मोरे यांची म्हसावद पोलिस ठाण्यात प्रभारी पोलिस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांची नंदुरबार पोलिस मुख्यालयात नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
नितीन पाटील यांनी विसरवाडी पोलिस ठाण्याचे पदभार सांभाळतांना अनेक गुन्हे व चोरीचे गुन्ह्याची उकल केली तर एका शाळेतील ३९ टॅबलेट चोरीचा गुन्हा उघडकीस केल्याची कामगिरी बजावली आहे. तर नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश मारोतराव वानखेडे यांची विसरवाडी पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.








