म्हसावद l प्रतिनिधी
गावातील विधवा,निराधार,गरजू व गरीब महिलांना स्वयंरोगार प्राप्त व्हावा यासाठी युवकमित्र परिवार नंदुरबार यांच्यामार्फत कोठली येथे मोफत शिवण काम प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी उद्घाटक म्हणून सरपंच गोकुळबाई भालेराव पाटील ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील सुकदेव पाटील, ठाणसिंग गिरासे,सेवा सोसायटी चे अध्यक्ष प्रकाश कोळी, युवकमित्र परिवाराचे अध्यक्ष प्रवीण महाजन,बादलसिंग गिरासे,सामाजिक कार्यकर्ते आसाराम माळी,पत्रकार पुरुषोत्तम आगळे, पौलदसिंग गिरासे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
दोन महिने चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्ग अंतर्गत गावातील वंचित,गरजू,विधवा ,निराधार अशा एकूण पंधरा महिलांना मोफत शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येणार असून येत्या वर्षभरात कहाटूळ गटातील सर्वच गावामध्ये किमान शंभर महिलांना मोफत प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित असल्याचे युवकमित्र परीवाराचे प्रवीण महाजन यांनी सांगितले. प्रशिक्षक म्हणून योगिता पाटील यांनी जबाबदारी स्वीकारली तर कार्यक्रम यशस्वितेसाठी अंगणवाडी सेविका कविता माळी,ग्रा.प.शिपाई दीपक गिरासे स्वयसेवक प्रवीण राजपूत, भुवनेश पाटील,संग्राम गिरासे,अंजली माळी, लक्ष्मण साळवे यांनी परिश्रम घेतले.








