Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

team by team
June 22, 2023
in राज्य
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

नंदुरबार  l

महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला समाजसेविका आणि स्वयंसेवी संस्थांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी 5 जुलै,2023 पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

          पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वर्ष  2020-21,2021-22,2022-23, व 2023-2024 या वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील महिला व बालकल्याण क्षेत्रात कमीत कमी 7 वर्ष कार्य केलेल्या नामांकित समाजसेविकांना जिल्हास्तर पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच  महिला व बालकल्याण क्षेत्रात कमीत कमी 25 वर्ष कार्य करीत असलेल्या नामांकित समाजसेविकांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येईल. तर महिला व बालकल्याण क्षेत्रात महिलांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी व शिक्षण पुनर्वसन इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच राजकारणापासून अलिप्त असलेल्या व दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला नाही अशा स्वयंसेवी संस्थांना विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी अर्ज करावेत.

पुरस्कारासाठी पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांनी विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज तीन प्रतीत बुधवार 5 जुलै,2023 पर्यंत सादर करावा. पुरस्काराच्या अधिक माहिती व विहीतनमुना अर्जासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र.226, टोकरतलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564-210047 वर संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.बिरारी यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’

Next Post

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे हस्ते संत निरंकारी आरोग्य केंद्राचे उद्घाटन

Next Post
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे हस्ते संत निरंकारी आरोग्य केंद्राचे उद्घाटन

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे हस्ते संत निरंकारी आरोग्य केंद्राचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add