Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’

team by team
June 22, 2023
in राजकीय
0
पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’

मुंबई l

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे १५ ते २० लक्ष वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’  सुरु करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या निर्णयानुसार ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ याची अंमलबजावणी, संनियंत्रण तसेच विमाहप्ता भरण्याची कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येणार आहे. या संदर्भात आज वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

 विमा योजनेचे स्वरुप

विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेंतर्गत दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत / अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने विमा योजना राबविण्यात येणार आहे.  दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास विमा कंपनीकडून  प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येईल. दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात/पाय व एक डोळा निकामी झाल्यास एक लाख रुपये तर एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.

वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येईल, असे या योजनेचे स्वरुप असणार आहे.

या विमा योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.

या विमा योजनेबाबत आवश्यकतेनुसार विमा संचालनालयाचा सल्ला घेण्यात येईल, असे वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची सुरक्षा कमी केलेली नाही -गृह विभागाचे स्पष्टीकरण

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add